सुखदं कार्य???
सकाळ झाली आणि सूर्याच्या पहिल्या सोनेरी किरणांनी पूर्व दिशा मधुरम्या हास्य देऊ लागली...ह्या किरणांना साथ देत चिमणीसुद्धा घरयातून बाहेर पडून आपले रेशमी पंख आकाशात सोडून मोकळा स्वास घेऊ लागली..ह्या रम्य अश्या शांत वातावरणात झाडांची पानं गुणगुणत वाऱ्यासोबत मधुर ताल देऊ लागली..हळू हळू सूर्य चारही दिशेला पसरला. आणि धरतीला पूर्ण प्रकाशाने शृंगारून टाकलं.
असे हे अदभुत आणि मोहक दृश्य पाहून मनात विचार आला की ह्या सुखद सकाळची सुरुवात सुखद कार्याने झाली पाहिजे..पण हे सुखद कार्य आहे तरी कोणतं??? आजकालच्या गर्दीमद्ये स्वतःला शोधणं फार कठीण झालं आहे बरोबर ना???कधी तरी थोड्या वेळासाठी स्वतःशी भेटणं झालं तर स्वतःचा विश्वास स्वतःवर होत नाही तोवर माणसांची गर्दी येते आणि पुन्हा ढकलून दूर घेऊन जाते..अश्या वेळी स्वतःला भेटलेला तो क्षण पुन्हा आठवून पुढचं आयुष्य सरत असतं.
जर तुमच्या आयुष्यात असंच एका सुखद सकाळची सुरवात सुखद कार्याने करण्याची संधी मिळाली तर ती तुम्ही कशी कराल???
मी एखाद्या प्राण्याला खाऊ घालेन...😇सुखद दिवसाची सुखद सुरुवात
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteमी घरातील पाळीव प्राण्याला जवळ घेईन...👐
ReplyDeleteछान! Positive विषय मांडलास 👌😊
ReplyDelete