घर असो तर असंच...❤️


           आयुष्य कसं असतं ना वेळेबरोबर पुढे सरत असतं..जेव्हा आपण आईच्या पोटात होतो तेव्हा जग कसं असेल? काय असेल? काहीच माहीत नसतं..वेळे बरोबर आयुष्य सरत असतं... हळू हळू दुधाच्या बाटलीची जागा पाटी खडू घेते..पाटी खडूची जागा पेन्सिल रब्बर घेते..पेन्सिल रब्बर ची जागा पेन घेते... आणि पेन हा शेवटपर्यंच..असच आपल्या आयुष्यात अश्या अनेक जागा बदलत असतात आणि शेवटी एक स्टँड येतोच..आयुष्यात खूप माणसं भेटतात..त्यांचा सोबत आपण जगत असतो..पण तो माणूस आपल्या आयुष्यात किती काळासाठी असेल ह्याचा आपण अंदाज बांधू शकत नाही..आपल्याला किती माणसं भेटतात किती सोडून जातात किती विसरूनही जातात पण काही माणसं ही हृदयाच्या एका कोपऱ्यात नेहमी राहतात..लहानपणापासून ते आतापर्यंत अनेक माणसं भेटली पण bmm department नसून ह्या bmm family मध्ये असलेल्या मायेसारखी माणसं भेटलीच नव्हती..जेव्हा bmm मध्ये प्रवेश घेतला तेव्हापासून आयुष्याचं पानंच बदललं...आईवडिलांनासारखी माया देणारे शिक्षक मित्रमैत्रीण मिळाले..एक वेगळा आनंद,एक वेगळं जग,एक वेगळी माया, तर काहींना एक समजूतदार साथीदार तर मला जीवाला जीव लावणारे मित्रमैत्रीण भेटले ..fybmm तर वाऱ्याच्या जुळूकासारखी एक मोठा आनंद आणि आठवाणी देऊन गेली..अप्पू माँ सारखी आई जी नेहमी समजून घेणारी समजून सांगणारी..पल्लू माँ च्या तर रागातही प्रेमच दिसायचं महेशसरांचं रोजच सकाळचं गाणं सगळयांना आजूनही आठवत असेल..सीमा माँ ही प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन देणारी.. प्रमोदसरांचं  रोज news paper न आणल्याने appesnty mark लावणं...तर G. D सरांसारखा 'बाप' माणूस जे नेहमी आमच्यावर रागावतात स्वतःचा bp high करतात आणि तरीही मनात प्रत्येकानंविषयी प्रेमच ठेवतात.. नारळाच्या कवटासारखे बाहेरून कडक पण आतून तितकाच गोड आणि नरम असा हा bmm demartment ला family च रूप देणारा असा हा bmm चा 'बाप' माणूस ह्या bmm मुळेच भेटला आणि अशी जबरदस्त family सुद्धा..family असावी तर अशीच जबरदस्त..ह्या bmm घराणें किती चुका किती गोष्टी संभाळून घेतल्या आहेत..प्रत्येक गोष्टीत  प्रोत्साहन दिलं आहे..
               आता हे शेवटच वर्ष काही दिवसानंतर हे वर्ष सोडून जावं लागणार तेव्हा  कोण कुठे तर कोण कुठे? कोणी कुठेही जाऊदे पण प्रत्येक विद्यार्ध्याला इतक्या आठवणी ह्या bmm ने दिल्या आहेत की जितकं बोलू तितकं कमीचं आणि ह्या आठवणी कोणच कितीही म्हातारे झालो तरी विसरणार नाही..Thank You soooo Much Bmm Family  इतका आनंद दिल्या बद्दल..खुप मिस करू आपण एकमेकांना  प्रत्येक तो क्षण जो आपण एकमेकांनमध्ये जगलेला आहे..miss u all...
खास करून:- अव्या,जिग्गी नमूं,अभि,ऐकता, विशाल,राहुल❤️

Comments

Post a Comment